अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये ऐश्वर्या-अभिषेकच्या व्हिडीओची चर्चा
(entertenment news) सध्या फेसबुक, ट्विटर (एक्स) किंवा इन्स्टाग्रामवरील अकाऊंट उघडलं की सर्वाधिक फोटो आणि व्हिडीओ जामनगरचेच पहायला मिळत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची धमाल या विविध फोटो आणि व्हिडीओंमध्ये पहायला मिळतेय. देशभरातील सर्व नामांकित सेलिब्रिटी आणि त्याचसोबत परदेशाहून विविध दिग्गज या प्री-वेडिंगला उपस्थित होते. अंबानींच्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते. बच्चन कुटुंबीयांचं अंबानी कुटुंबाशी खास नातं आहे. अभिषेक बच्चन त्याची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासोबत प्री-वेडिंगला पोहोचला. या तिघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या हे मुलगी आराध्यासोबत बसलेले दिसत आहेत. कार्यक्रमातील गाण्यांवर हे तिघं धमाल करताना पहायला मिळत आहेत. तिघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले आहेत. गेल्या काही महिन्यांत ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या जोरदार होत्या. मात्र वारंवार ही जोडी एकत्र दिसली आणि घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आतासुद्धा पुन्हा एकदा ही जोडी चाहत्यांसमोर एकत्र आली आहे.
पहा व्हिडीओ
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आराध्याच्या बदललेल्या हेअरस्टाइलवरून कमेंट केली. तर काहींनी तिच्या उंचीवरून प्रतिक्रिया दिली. ‘आराध्याला शाळा नसते का, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात’, असा सवालही काहींनी केला. आराध्याला लहानपणापासूनच बँग्स असलेल्या हेअरस्टाइलमध्ये पाहिलं गेलंय. तिला सतत एकाच लूकमध्ये पाहून नेटकरीसुद्धा कमेंट्स करू लागले होते. अखेर आराध्याचा वेगळा लूक नेटकऱ्यांना पहायला मिळाला आणि तो सर्वांनाच आवडला.(entertenment news)
आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, असा सवाल करत नेटकऱ्यांनी याआधीही ट्रोल केलं होतं. त्यावर अभिषेकने एका मुलाखतीत चोख उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ‘शनिवार-रविवार सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे कृपया या गोष्टींचा बाऊ करू नका’, असं तो म्हणाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याला जन्म दिला.