जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग

(entertenment news) मुंबईतल्या वांद्रे पश्चिममधील पाली हिल परिसरात असलेल्या नवरोज हिल सोसायटीला बुधवारी रात्री आग लागली. याच इमारतीत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससुद्धा राहते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या तेराव्या मजल्यातील एका किचनमध्ये ही आग लागली होती. जॅकलीनचा या इमारतीत 5 बीएचके अपार्टमेंट आहे. रात्री 8 वाजताच्या सुमारास नरगिस दत्त रोडवरील या इमारतीला आग लागली होती. तेराव्या मजल्यावरील ही आग चौदाव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.

जॅकलीनने गेल्याच वर्षी वांद्रे परिसरातील या इमारतीत आलिशान घर खरेदी केलं होतं. या घराचा एक व्हिडीओ जुलै महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इमारतील विविध रेंजमधील हाऊसिंग पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सूट्स, पेंटहाऊस, स्काय विला आणि मॅन्शन यांचा समावेश आहे. पाली हिल परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. यामध्ये सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानसुद्धा या परिसराच्या काही मिनिटांच्या अंतरावर राहतात. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणसुद्धा या परिसरात शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या त्यांच्या घराचं बांधकाम सध्या सुरू आहे.

जॅकलीन फर्नांडिसबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या हॉलिवूड पदार्पणाची जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटात ती जीन-क्लाउड वॅन डॅमसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर तिने त्याच्यासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता. यासोबतच तिने इटलीत एका प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण केलंय. (entertenment news)

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातही जॅकलीनचं नाव समोर आलंय. याप्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. मात्र जॅकलीनने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सुकेशने मला या प्रकरणात गोवलं, असं म्हणत तिने आरोप मागे घेण्याची विनंती दिल्ली हायकोर्टात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *