कोल्हापूरच्या उमेदवारीवर विमानतळावर खल; ‘या’ चर्चेने तर्कवितर्कांना उधाण
कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक यांच्याशी रविवारी चर्चा (discussion) केली. टर्मिनल इमारत पाहणीदरम्यान बाजूला जात सुमारे दहा मिनिटे ही चर्चा सुरू होती. खा. मंडलिक यांनाच कोल्हापुरातून उमेदवारी मिळावी, अशी निवेदनाद्वारे मागणी आ. आबिटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शनिवारी केली होती. यामुळे आज झालेल्या या चर्चेने तर्कवितर्कांना उधाण आले.
मुख्यमंत्री शिंदे दोन तासांच्या कोल्हापूर दौर्यावर होते. लोकार्पण सोहळ्यानंतर टर्मिनल इमारतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा इमारतीची पाहणी करताना शिंदे यांनी आ. आबिटकर यांना बाजूला येण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी खा. मंडलिक यांनाही बोलावून घेतले. त्यांच्यात काही वेळ चर्चा (discussion) सुरू होती.
दरम्यान खा. माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके हे देखील आले. सत्ताधार्यांच्यासोबत असूनही लोकसभा निवडणूक चर्चेत घेत नसल्याने नाराजी व्यक्त केलेले आ. राजेंद्र पाटील-यड्रावकरही चर्चेत सहभागी झाले. सुमारे पंधरा मिनिटांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे उर्वरित पाहणी करून विमानाने नांदेडला रवाना झाले.