करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची होणार पाहणी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या (idol) संवर्धनासाठी दिवाणी न्यायालयाने नियुक्त केलेल्या (कोर्ट कमिशन) दोन अधिकार्‍यांकडून पाहणी होणार आहे. गुरुवार (दि. 14) व शुक्रवारी (दि. 15) सकाळी सातपासून पाहणी केली जाणार आहे. अंबाबाई मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, पुरातत्त्व विभागाच्या निवृत्त तज्ज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी, असा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी 2022 मध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे दाखल केला होता. या दाव्यात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई आणि मूर्ती अभ्यासक अ‍ॅड. प्रसन्न मालेकर हेही वादी म्हणून सहभागी झाले आहेत.

याप्रकरणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त उपअधीक्षक विलास मंगीराज आणि निवृत्त मॉड्यूलर आर. एस. त्र्यंबके यांची कोर्ट कमिशन म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी पाहणी करून 4 एप्रिलपर्यंत अहवाल देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मंगीराज आणि त्र्यंबके हे गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस मूर्तीची पाहणी करणार आहेत. सकाळी सातपासून ही पाहणी सुरू होणार आहे. या दाव्याचे वादी मुनीश्वर, देसाई आणि अ‍ॅड. मालेकर यांच्या उपस्थितीत ही पाहणी होणार आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर (idol) 1955 साली व—जलेप झाला होता. तो गळून पडल्याने राज्य शासनाने 1999 साली वज—लेप करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला आक्षेप घेण्यात आला. न्यायालयात दावे दाखल झाले. त्यामध्ये सर्व वादी-प्रतिवादींची तडजोड होऊन 2015 साली पुरातत्त्व खात्याने मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले. मात्र, या संवर्धनातील त्रुटी तत्काळ समोर आल्या. मूर्ती संवर्धन झाल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या सूचनांचे पालन झाले नाही. त्यामुळे अधिकच जीर्ण होत चाललेल्या मूर्तीच्या अवस्थेबद्दल फेब—ुवारी 2022 मध्ये प्रश्न उपस्थित झाले. त्यावर पुरातत्त्व विभागाकडून पाहणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले होते. पण पुरातत्त्व विभागाकडून पाहणी झाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुरुवारी व शुक्रवारी ही पाहणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *