मिरज : जराशी बेपरवाही पडली महागात
(crime news) येथील हायस्कूल रस्त्यावरून सुभाष माधव डोंगरे (वय ७४, रा. वाटवे गल्ली, मिरज) या वृद्धाचे ४० हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने हातोहात लंपास केली. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुभाष डोंगरे हे हायस्कूल रस्त्यावरील एका बँकेत गुरुवारी सकाळी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून ४९ हजार रुपये काढले. त्यानंतर ते सायकलवरून घरी परतत होते. परंतु बँकेपासून काही अंतरावर आल्यावर सायकलच्या चेनमध्ये सुतळी अडकली. ती सुतळी कट करण्यासाठी डोंगरे हे जवळच असलेल्या चहाच्या टपरीमध्ये चाकू किंवा कात्री आहे का हे पाहण्यासाठी गेले. (crime news)
याचा फायदा घेत डोंगरे यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने सायकलला अडकवलेली ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक पासबुक व अन्य कागदपत्रे असलेली पिशवी हातोहात लंपास केली. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.