‘या’ दुहेरी हत्याकांडामुळे पुणं हादरलं

(crime news) सुसंस्कृतांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. दररोज गुन्ह्यांच्या नवनवीन, घाबरवणाऱ्या घटना समोर येत असतात. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने त्याच्या पत्नीची आणि पोटच्या लेकीची देखील निर्घृणपणे हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे पुणं हादरलं आहे. दत्तनगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली. अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो स्वत:च पोलिसांच्या समोर हजर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे हा धक्कादायक प्रकार घडला. अजयने आज पहाटे त्याची पत्नी श्वेता (वय 40) आणि अल्पवयीन मुलीची हत्या केली. चाकूने वार करून आणि उशीने गळा दाबून त्याने पत्नी आणि मुलीला संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा फायनान्स ॲडव्हायजर म्हणून काम करत होता. अजय आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक मुद्यावरून वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री देखील त्या दोघांमध्ये असाच वाद झाला होता. पत्नीने रागाच्या भरात माहेरी निघून जजायची धमकी दिली. नंतर ती रागाच्या भरातच जाऊन झोपली. (crime news)

संतापलेल्या अजयने रात्री त्याच्या पत्नीवर चाकूने वार करून तिला संपवलं. मात्र तेवढ्यात त्याच्या मुलीलाही जाग आली. हे पाहून त्याने मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचाही जीव घेतला. या सर्व घटनेनंतर आरोपी अजय हा सकाळी स्वत:च पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *