श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुधाकर शहापुरे; व्हा. चेअरमनपदी संजय कांबळे

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., शिरोळ या पतसंस्थेच्या सन २०२२-२०२७ सालाकरीता संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या चेअरमनपदी सुधाकर गजानन शहापुरे यांची व व्हा. चेअरमनपदी संजय रामचंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद फडणीस यांनी काम पाहिले. नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखान्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व युनियन अध्यक्ष बाळासो बनगे व त्यांचे सहकारी आणि संस्थेचे नुतन संचालक विजय चौगुले, यासिन कुरणे, दादासो खिलारे, शिवाजी पाटील, संजय कंदले, अशोक चौगुले, राजेंद्र केरीपाळे, कृष्णा पाटील, सुरेश आंबी, अनिल भंडारे, अनिलकुमार सुतार, सौ. संपदा पाटील, सौ. वैशाली कुरणे तसेच संस्थेचे सेक्रेटरी महेश परीट व संस्थेचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

सुधाकर शहापुरे, चेअरमन

 

संजय कांबळे, व्हाईस चेअरमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *