दानोळी परिसरात खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दानोळी (ता. शिरोळ) येथील मैथिली संतोष चंदोबा (वय 6) या बालिकेचा डेंग्यूसद़ृश आजाराने मृत्यू (death) झाला. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे. नेजकर गल्लीच्या परिसरात डेंग्यूसद़ृश आजाराची साथ आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मैथिलीला गेल्या चार दिवसांपासून ताप आला होता. गावातील खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू होते; पण ताप कमी न आल्याने सोमवारी सकाळी तिला सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने सोमवारी सायंकाळी तिला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तिथे तिची तब्येत खालावली आणि मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान तिचा मृत्यू (death) झाला. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, चुलते, चुलती असा परिवार आहे.

बहीण, चुलतीलाही लागण

मैथिलीची लहान बहीण स्वरा (वय 3) हीसुद्धा डेंग्यूसद़ृश आजाराने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल आहे; तर तिची चुलती जयसिंगपूर येथे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *