पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र
पेन्शनधारकांना (pensioners) यापुढे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. आता ते घरबसल्या मोबाईल अॅपवरून हे काम करू शकणार आहेत. सरकारने यापूर्वीच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे.पेन्शन (Pension) सुरू ठेवण्यासाठी, प्रत्येक पेन्शनधारकाला त्याचे जीवन प्रमाण पत्र (Jeevan Pramaan Patra), ज्याला जीवन प्रमाणपत्र लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) म्हणूनही ओळखले जाते, बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जमा करावे लागते. पण आता फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी (Face Recognition Technology) वआणल्यामुळे ते हे काम ऑनलाइनही करू शकणार आहेत.
फायदा कोणाला होईल
केंद्र सरकारच्या 68 लाख पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देण्याच्या फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि राज्य सरकारचा फायदा होईल. पेन्शनधारकांनाही फायदा होईल.
ही सुविधा विशेषतः अशा वृद्ध पेन्शनधारकांसाठी उपयुक्त आहे, जे विविध कारणांमुळे बायोमेट्रिक आयडी म्हणून बोटांचे ठसे सादर करू शकत नाहीत. आता ते UIDAI आधार सॉफ्टवेअरवर आधारित चेहरा ओळख सेवेद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सक्षम असतील.अॅपवरून असे करा सबमीट
सर्व प्रथम गुगल स्टोअरवर जा आणि आधार फेस आयडी अॅप (Aadhar Face Id App) डाउनलोड करा. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या लिंकवरुन App डाऊनलोड करता येतील.
किंवा फेस ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jeevanpramaan.gov.in/ ला भेट द्या.
हे App इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेले ऑथरायजेशन करावे लागेल. ऑपरेटर ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करा आणि ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करा. येथे पेन्शनधारक स्वतः ऑपरेटर असू शकतो, कारण ही एक-वेळची प्रक्रिया आहे आणि ती पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही.
डिजीटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) आणि पेन्शनर ऑथेंटिकेशनसाठी डिव्हाईस तयार असेल पेन्शनधारकांना आता त्यांचा तपशील त्यामध्ये भरावा लागेल.
त्यानंतर पेन्शनधारकाचा लाइव्ह फोटो स्कॅन करा.