शिरोळ तालुक्यातील लम्‍पी स्‍किनचा पहिला बळी

टवाड (ता. शिरोळ) येथे एका जनावराचा लम्पी स्किन’ या आजाराने बळी घेतला आहे. तालुक्यातील हा पहिला बळी असून या आजाराचा धोका जिल्ह्यात वाढत चालला आहे. पंधरा दिवसांपूर्वी गायीला लम्पी आजाराची लागण झाली होती. या गायीवर औषधोपचार सुरू होते. या आजारातून गायीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आज (शुक्रवार) पहाटे या गायीचा मृत्यू झाल्याचे डॉ. सागर पटेल यांनी सांगितले. आज या आजाराने गायीचा बळी घेतल्याने तालुक्यात बाधित जनावरे किती असा प्रश्न पशुवैधकीय विभागासमोर आला आहे.

कुटवाड येथील दत्तात्रय रामचंद्र पाटील या शेतकऱ्याच्या जरसी गायीला दहा दिवसांपूर्वी लम्पी आजाराची लक्षणे दिसून आली. यानंतर पाटील यांनी आपल्या गायीवर पशुवैद्यकीय केंद्रात औषधोपचार सुरू केले होते. या गायीला ताप आला होता. तिने वैरण खाणे सोडले होते. डॉ. सागर पाटील हे त्या गाईवर उपचार करत होते. गायीला दोन दिवसांत अचानक अशक्तपणा जाणवू लागल्याने. पुढील उपचार सुरू असताना आज पहाटे या गायीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील हा पहिला बळी असून शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जनावर वैरण खात नसतील, ताप आला असेल, अंगावर पुरळ अथवा फोड आले असतील तर तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सागर पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *