अकिवाट येथील लक्ष्मी देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न
टाकळीवाडी नामदेव निर्मळे :
अकिवाट येथील नाईक मळा (पश्चिम भाग) लक्ष्मी देवीची जत्रा व ओटी भरणेचा समांरभ (ceremony) सालाबादप्रमाणे शुक्रवारी २३ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी १०.०० वाजता वालुग पुजन, ११.०० वाजता ओटी भरणी करुन दुपारी १२.०० नंतर उपस्थित भक्तानी देवीचा आशिर्वाद घेऊन महाप्रसादाचा स्वाद घेतला.
याचे नियोजन यात्रा कमिटी चे सदस्य, गुरुदत्त शुगर्सचे संचालक संजयकुमार गायकवाड,जवाहर कारखाना संचालक संजयकुमार कोथळी,जनता सोसायटी व्हा.चेअरमन बाबू दानोळे,अरूण कोथळी, अजित मगदुम, बाबासाहेब कागे, आप्पासाहेब आंबी,महाविर सौंदते,अजित कोथळी, अशोक कोथळी,शांतीनाथ कोथळी, मनोहर घोसरवाडे, सुदर्शन माने,राजू कोथळी, विद्यासागर दानोळे,भरत रायनाडे, विद्यासागर जुगळे, पोपट दानोळे,शांतिनाथ खुरपे,बापू कागे, चंद्रकांत नाईक सर,सागर सौंदत्ते,श्रीधर कोथळी,कर्याप्पा गावडे,अजित पुजारी व शेतकरी बांधवांनी नियोजन केले होते.
या यात्रेस (ceremony) महिला वर्ग, परिसरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, धनगर समाजातील बांधव, ग्रामस्थ, भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.