टाकळीवाडी मध्ये वेदीशुद्धी व चंद्रप्रभ महामंडल आराधना महोत्सव सुरू
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथे दिनांक 26/09/2022 ते 27/09/2022 दोन दिवस आराधना महोत्सव संपन्न होत आहे.
यजमान सौ धर्म इंद्र श्री रोहित रत्नाकर एकांडे व सौ धर्म इंद्रायणी सौ वर्षा रोहित एकांडे यजमानपद मानकरी आहेत.
परमपूज्य प्रज्ञायोगी दिगंबराचार्य श्री गुप्तीनंदीजी गुरुदेवांचे परम प्रभावक शिष्य परमपूज्य प्रज्ञाश्रमण मुनिश्री सुयशगुप्तजी गुरुदेव व परमपूज्य प्रज्ञाश्रमण मुनिश्री चंद्रगुप्तजी गुरुदेव यांच्या सानिध्यात कार्यक्रम संपन्न होत आहे.
गावातून यजमान यांचे रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील जैन धर्मातील महिला, पुरुष, मोठ्या आनंदात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजक श्री भरत पाटील उपसरपंच ,अजित पाटील, भरत पाटील, राकेश पाटील ,जितेंद्र कोथळी, धनपाल कोथळी, राजू जुगळे, रामचंद्र आवटी, आप्पासो कुरपे, पारीस काणे, कुमार गोरवाडे, राजू पाटील, अरुण पाटील, यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली.