सैनिक टाकळी येथे वारंवार शेतीपंपाची केबल चोरी
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी ,तालुका:- शिरोळ येथे रामदास राजाराम पाटील (इचलकरंजी मळा) या शेतकऱ्यांची नदीवर बसवलेली मोटरीचे तीनशे फूट केबल काल रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून. या आधी सुद्धा आणखीन काही शेतकऱ्यांची मोटारींची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
सैनिक टाकळी मधून असेच नदीवर बसलेले पंपांचे केबल चोरीस जात आहेत. त्यामुळे सैनिक टाकळीतील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्याकडून अशी मागणी आहे की अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे