अकिवाट येथे पाणदारे दाम्पत्यानी जपली भारतीय संस्कृती
टाकळीवाडी नामदेव निर्मळे
(local news) शिरोळ तालुक्यातील अकिवाट हे गाव शैक्षणिक, राजकीय, धार्मिक तिर्थक्षेत्र करिता जशी प्रसिद्ध आहे.तशी भारतीय संस्कृती ही येथे जपली आहे.अकिवाट येथील रवींद्र पाणदारे व सौ.राजश्री पाणदारे या दाम्पत्यानी आपला पारंपरिक बेकरी व्यवसाय करत दुध – दुभत्या करिता देशी गायीचे संगोपन केली आहे. पाणदारे दाम्पत्यानी पारंपारीक पद्धतीने गाईचे डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजिले होते.
त्यानुसार सोमवार सकाळी पौरोहित आण्णाप्पा स्वामीं यांच्या कडून गोमातेचे पुजाविधी केली तर उपस्थित महिलांनी गाईचे औक्षण करून त्यास गोड-धोड नैवेद्य चारवून डोहाळे कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.पाणदारे दाम्पत्याना रोहन व बसव असे दोन मुले आहेत.आपल्या मुली प्रमाणे गाईचे संगोपन केले आहे. गाईच्या डोहाळ जेवण करिता पाहुणे-मित्रमंडळी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)