हेरवाडच्या तरुणाने अनुभवला पब्जी खेळाचा/ मोबाईलचा दुष्परिणाम….
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
हेरवाड तालुका:- शिरोळ, जिल्हा:- कोल्हापूर येथील तरुण शिवराज कोळी वय 24 हा तरुण पब्जी खेळाच्या आहारी भरपूर गेला आहे.तो सतत पब्जी खेळ खेळत असतो .त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याला अनुभवायला आले.
रात्री एक वाजेपर्यंत पब्जी खेळ खेळत असतो.त्याचे आहाराकडे व कुटुंबाकडे फार दुर्लक्ष होत आहे.हा कुठे बसेल तिथे पब्जी खेळत बसतो.
मोबाईल मध्ये चार्जिंग नसेल तर हा तरुण चिडचिड होतो.पब्जी खेळाचे दुष्परिणाम हा स्वतः अनुभवलेला आहे.मोबाईलचा वापर कमी करावा असे तो आव्हान करत आहे .
कुटुंबाकडे व करिअर कडे लक्ष द्यावे हा विनंती करत आहे.मोबाईल इंटरनेटचा वापर कमी करावा पब्जी खेळामुळे माझा फार वेळ वाया गेलेला आहे असे तो सांगत आहे.सध्याची वस्तूस्थिती तरुण पिढीमध्ये बघायला मिळत आहे.