दत्तवाड येथे उसाच्या फडला शॉर्टसर्किटने लागली आग चार एकर ऊस जळून झाले खाक
टाकळीवाडी नामदेव निर्मळे
घटनास्थळावरुन मिळालेली आधीक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील दतवाड येथील बिरणाल रोड जवळील गट नंबर 260, गुंडा व्हसकले, 264 बाबासो कमते, 274 आप्पासो हेब्बाळे यांच्या मालकीची शेत जमीन आहे.या ठिकाणी शॉर्टसर्किटने अंदाजे चार एकर मधील ऊस जळून खाक झाले आहे.यामध्ये लाखो रुपयाचा नुकसान झाले असुन, हाता तोंडाला आलेला आणि चालू वर्षी कारखान्याला जाणाऱ्या उसाला लागलेली आग पाहून शेतकऱ्यांची डोळे पानवलेली होते.
तरी या सदर ठिकाणचे पंचनामे त्वरित होऊन त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांच्या कडून मागणी होत आहे.ऊस गळीपाचा हंगामाला अजून सुरुवात झालेली नाही, तरी या पेटलेल्या उसाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्याकडून उमटत आहे.या ठिकाणी घटनास्थळी महावितरण चे कर्मचारी दाखल होऊन पाहणी केली ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रदीप हबाळे, बाहुबली हेबाळे, सुरेश हेबाळे, भैय्या व्हसकले, पवन धोतरे , राकेश हेबाळे, सचिन संकपाळ, संतोष सवळे, सुरज पाटील, पवन हेबाळे यांच्यासह शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.