जेष्ठ पत्रकार गणपती कागे यांची नात नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
(local news) अकिवाट येथील जेष्ठ पत्रकार गणपती कागे यांची नात कुमारी प्रणाली अजित नंदगावे हिला आनंदगंगा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आला. सदरचा पुरस्कार सोहळा संजय घोडावत कॉलेज अतिग्रे येथे संपन्न झाला.
विविध क्षेत्रात आपल्या कार्याची ठसा उमटविणाऱ्या नारींचा कोल्हापुरी फेटा, सन्मान पत्र , सन्मान चिन्ह,पदक, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.प्रणाली हीचे शालेय शिक्षण आजी आजोबांच्या कडे झाले आहे.सद्या कोटक महिंद्रा बँकेत नोकरीस असुन तिच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
या सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक तानाजी पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष-ऋता कळमनकर, पेठ वडगांवचे नगराध्यक्ष- मोहनलाल माळी,सोलापूर उपशिक्षणाधिकारी- सुधा साळुंखे,रुक्मिणकांत कळमनकर,रणजींतसिंह भोसले(सरकार)प्रा.सुमन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.प्रणालीचे परिसरातून कौतुक होत आहे. (local news)