पद्मावती सहकारी दूध संस्था टाकळीवाडी यांच्यावतीने बोनस वाटप…

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

टाकळीवाडी, तालुका :-शिरोळ येथील श्री पद्मावती सहकारी दूध संस्था यांच्याकडून सन 2021/ 22 यावर्षीचे बोनस (Bonus) वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .मधुकर पाटील साहेब (शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष) तसेच संस्थेचे चेअरमन साताप्पा आवटी यांच्या हस्ते बोनस वितरण करण्यात आला.

म्हैस दूध विभाग शेकडा 6 रुपये व गाय दूध विभाग शेकडा 5 रुपये या पद्धतीने बोनस (Bonus) जाहीर करण्यात आला. म्हैस दूध विभागात प्रथम 5 मानकरी ठरले.1) अनिल आवटी 2) उत्तम गोरे 3) ओंकार एकसंबे 4) इंदुमती वडर 5) वैभव आवटी हे 5) मानकरी ठरले.

गाय दूध विभागात प्रथम पाच मानकरी ठरले. 1) अनिल आवटी 2) शांतिनाथ गोरवाडे 3) अक्षय उगारे 4) अक्षय आवटी 5) रोहिदास निर्मळे हे 5 मानकरी ठरले. यावेळी माजी उपसरपंच भरत पाटील, कृष्णा कोळी, सागर काने, गावकरी, दूध उत्पादक, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *