मुसळधार पावसामुळे शिरोळ-शिरटी रस्त्यावर पाणी
काल (शुक्रवार) रात्री शिरोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी (water) आले आहे. रात्री १२ वाजल्यापासून सुमारे २ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शिरोळ-शिरटी रस्त्यावर जगदाळे वीटभट्टीजवळ रस्त्यावर दोन फूट पाणी आले आले. ऑक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीत रस्ता पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिरोळ-रस्त्यावर पाणी आल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची अडचण झाली आहे. काही नागरिक मात्र धाडस करून पाण्यातून मार्ग काढत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान रस्त्यावर आलेले पाणी बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली आहे. हसूरकडून- शिरटीमार्गे शिरोळला जाणारी एसटी रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे (water) थांबली आहे. पाण्यातून पुढे जाता येत नसल्याने अनेक वाहनधारकांना मागे फिरण्याची वेळ आली आहे.
पावसामुळे चिंचवाड- शिरोळ मार्ग पाण्याखाली
चिंचवाड- शिरोळ रस्ता काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. रात्री १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यानंतरही पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे चिंचवाड -शिरोळ या मार्गावर दी न्यू हायस्कूलजवळ रस्त्यावर जवळपास दोन ते अडीच फूट पाणी आल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात रस्ता पाण्यात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. रस्त्यावरील पाणी उतरेपर्यंत ग्रामस्थांना शिरोककडे जाण्यासाठी उदगावमार्गे प्रवास करावा लागत आहे.