श्री वृहद गणधर वलय विधानाचे रथोत्सवाने सांगता
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
अकीवाट तालुका:- शिरोळ येथे दिनांक 28 10. 2022 ते 5 .11.2022 अखेर विद्यानगर येथील विद्यासागर मंदिर व विद्यासागर हायस्कूलच्या प्रांगणात अतिशय उत्साहात मंगलमय वातावरणात धार्मिक विधीने (religious rituals) गणधर वलय विधान संपन्न झाले .या विधानामध्ये गणधर वलय विधानाचे बीजाक्षर चे पूजन व वाचन झाले .
परमपूज्य प्रज्ञा श्रवण मुनी श्री सुयश गुप्त जी महाराज व परमपूज्य प्रज्ञाश्रमण मुनीश्री चंद्रगुप्त जी महाराज यांच्या पावन सानिध्यात प्रतिष्ठाचार्य डॉक्टर सम्मेद उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वृहद गणधर वलय संपन्न झाले या विधानात विविध धार्मिक विधी (religious rituals) होम हवन सह रोज रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रोज सकाळी मंगल वाद्य जलाभिषेक दुपारच्या सत्रात प्रज्ञा श्रमण मुनी श्री सुयश गुप्तजी महाराज व प्रज्ञाश्रमण मुनी श्री चंद्रगुप्त जी महाराज यांच्या सदुपदेशाने श्रावक श्राविका व भक्तगण मंत्रमुग्ध होत या विधानात ज्याने ज्याने योगदान दिले आहेत त्या सर्वांचे गुरुजनाकडून आशीर्वाद व जपमाळा धर्म पुस्तक देऊन आशीर्वाद दिले.
रात्रीच्या सत्रात दोन हत्ती, सात रथ ,बारा घोडे यासह चार बँड सह केरळी वाद्य गावाच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक पार पडले सत्काराचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासो पुदाले सर यांनी केले.
अकिवाट नगरीत संपन्न झालेल्या श्री वृहद गणधर मंडल विधानाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर स्थळ रावसाहेब नाईक गॅरेज रविवार दिनांक 6 .11 .2022 रोजी सकाळी दहा ते तीन पर्यंत.