झोपडपट्टी धारकांच्या न्यायासाठी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन

प्रतिनिधी:-विजय पाटील

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माहिती अधिकार व मानवाधिकार विभाग तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा (march) निघणार आहे.

जयसिंगपूर नगरीमधील सर्व झोपडपट्टीधारकांना नम्र विनंती शासन निर्णय १९९५ तसेच सुधारित सुधारित शासन निर्णय २००२ व २०११ प्रमाणे अतिक्रमणधारकांचे नियमितीकरण होऊन त्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी मंगळवार दिनांक १५/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता शिरोळ तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चाचे (march) आयोजन केले आहे. तरी सर्व झोपडपट्टीधारकांनी आपल्या हक्काच्या घरासाठी व प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी व्हावे.

आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय आपल्याला घरकुल योजनेची अंमलबजावणी होणार नाही तसेच जयसिंगपूर या ठिकाणी आसपासच्या भागातून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गेली वीस ते पंचवीस वर्षे याठिकाणी कायमचे वास्तव्य केलेल्या भाडेकरू लोकांच्यासाठी म्हाडा सारखा प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून त्यांचे देखील याठिकाणी कायमचे पुनर्वसन व्हावे व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन व्हावे यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *