स्वराज्यक्रांती जनआंदोलन महाराष्ट्र संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित
प्रतिनिधी:- विजय पाटील
सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२२ चे अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/ग्रापनि २०२२/ प्र.क.०८, दिनांक ०९/११/२०२२ अन्वये शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेले गावे व त्यालगतची गावे या गावामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे आदम मुजावर यांनी आपण आपल्या मागण्यांबाबत संबंधीत विभागाशी चर्चा करून योग्य त्या सनदशीर मार्गाने सोडवून घ्याव्यात असे सांगितले आहे. तसेच आपण आपले धरणे आंदोलन (agitation) स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे, असे पोलीस प्रशासनाकडून पत्र मिळाले आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मागील चार दिवसापासून सुरू असलेले स्वराज्यक्रांती जनआंदोलन महाराष्ट्र यांचे आंदोलन (agitation) तात्पुरते स्थगित केले आहे.