आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
(local news) अकिवाट ग्रामपंचायत निवडणुकीत यड्रावकर गट, भारतीय जनता पार्टी व आवाडे गट प्रणित अकिवाट ग्रामविकास परिवर्तन पॅनेल मार्फत निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच वंदना सुहास पाटील व नवनिर्वाचित सदस्य यांची मिरवणुक व जाहीर सत्कार आ.राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या शुभ हस्ते व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली अकिवाट येथे पार पडला. या वेळी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सर्व प्रमुख, गावातील ग्रामस्थ व युवा वर्ग उपस्थित होते. (local news)