तहसीलदार शिरोळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन
प्रतिनिधी:- विजय पाटील
भगवान दत्तू सूर्यवंशी राहणार कोथळी यांच्या जागेवर बाळासाहेब अण्णाप्पा जाधव यांनी जाणून-बुजून रमाई आवास घराचे काम सुरू करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. भगवान दत्तू सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आर.पी.आय आठवले गटाचे जिल्हा संघटक राजेश शिंदे यांनी तहसीलदार शिरोळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.तसेच आर.पी.आय आठवले गटाचे तालुका सचिव संजय शिंदे, स्वराज्यक्रांती जिल्हाध्यक्ष कैलास काळे उपस्थित होते.