श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न
शिरोळ प्रतिनिधी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वैभवशाली प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारखाना व्यवस्थापन आणि कामगार (workers) संघटनेचे पदाधिकारी हातात हात घालून काम करीत असल्यामुळे कामगारांचेही हित जोपासले जात आहे. असे प्रतिपादन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.
शर्करा औद्योगिक श्रमिक संघ द्वारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील पुढे म्हणाले की दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. कामगारांनीही संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले त्याचमुळे आपला साखर कारखाना देशात आदर्शवत बनला आहे कारखाना व कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या उद्योग समूहातील सर्वच कामगार समाधानी आहेत. कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. विषय पत्रिकेचे वाचन जनरल सेक्रेटरी अविनाश भुशीगें यांनी केले उपस्थित कामगार (workers) सभासदांनी सर्व विषयांना टाळ्याच्या गजरात मंजुरी दिली. या सभेत कामगार संघटनेच्या कार्यकारणी समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आला तीन वर्षाच्या ऐवजी पाच वर्षाचा कार्यकाळ करण्यात आला आहे. या सभेत नूतन कार्यकारणी समिती निवडण्यात आली तसेच या अहवाल सालात सेवानिवृत्त झालेले साखर कारखान्याचे 51 कर्मचाऱ्यांचा येथोचित सन्मान गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कामगार संघटनेचे नूतन अध्यक्ष प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे जनरल सेक्रेटरी अरुण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक सभेचे प्रमुख पाहुणे व दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील प्रोडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे वर्क्स मॅनेजर सजाँय सकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या वार्षिक सभेस दत्त कारखान्याचे सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हेड टाईम कीपर राजेंद्र केरीपाळे यांनी आभार मानले.