स्मार्ट चॅम्पस टाकळी इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
पत्रकार :-नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी.- तालुका :-शिरोळ येथील स्मार्ट चॅम्पस टाकळी इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य आणि नाटिका सादर करून साजरी केली. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण घेऊन, पुढे स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली याची सविस्तर माहिती दिली.
त्यावेळी चेअरमन विजय सर, राजश्री मॅडम, मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील , शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना, निवेदन आणि आभार विद्यार्थ्यांनी केले.