टाकळीवाडी येथील जागृत देवस्थान श्री यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात प्रारंभ

पत्रकार:- नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची (goddess) यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. दिनांक 05/01/2023 रोजी सकाळी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात ढोल, ताशा, लेझीम याच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. व नैवेद्य देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

दिनांक 06/01/2023 रोजी देवीला (goddess) पोळीचा नैवेद्य देण्यात येतो.व रात्री नऊ वाजता आर्केस्ट्रा चा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. दिनांक 07/01/2023 रोजी संध्याकाळी जंगी कुस्ती व रात्री नऊ वाजता प्रतीक तानाजी पाटील देव मामा यांचा देवीचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

टाकळीवाडी गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान अशी ख्याती असलेले पंचक्रोशीतील श्री यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी होत आहे. कोरोनामुळे दोन-तीन वर्ष यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करता आली नव्हती.सध्या कोरोना नसल्यामुळे अति उत्साहाने यात्रेस प्रारंभ झालेला आहे. विविध स्पर्धा, ढोल स्पर्धा, हलगी वादन, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *