वंचितच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी लोकलढा उभारावा : जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांचे आवाहन
हेरले (प्रतिनिधी):
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नासोबत प्रामाणिक राहून त्यांच्यासाठी लोकलढा (fight) उभारावा. चांगले रस्ते, पूर्ण वेळ वीज, स्वच्छ पाणी व चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्यामध्ये येथील राज्य शासनाला पूर्ण अपयश आले असून त्याविरोधात सर्वांना सामावून घेवून लोक आंदोलने करावीत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले.
हेरले (ता. हातकणंगले) येथे पक्ष पदाधिकारी व निरीक्षक यांच्या पक्ष कामकाजा विषयीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आशपाक देसाई होते.
विलास कांबळे पुढे म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी राज्यातील आलुतेदार, बलुतेदारसह वंचित घटकांना न्याय व सन्मान मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. तिला बळ देण्यासाठी त्या समुहामध्ये जावून त्यांच्या प्रश्नाशी थेट भिडावे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करावा.
यावेळी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर लोकलढा (fight) उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा सह सचिव विश्वास फरांडे, रणजित कटकोळे, संताजी खाबडे, नुरमहम्मद खतीब, दादासो काशिद, अभिजीत काशिद, विश्वनाथ कांबळे (मुडशिंगी), सखाराम कांबळे (शिरोली), सचिन कांबळे, राहुल फरांडे (कबनूर), संभाजी कोठावळे (मजले), कुंदन नाडे, विजय कवठेकर (कुंभोज) आणि जिल्हा परिषद पक्ष निरीक्षक उपस्थित होते.
🙏🙏
संजय आप्पासाहेब सुतार
आय. टी. व प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर (उ.)