टाकळीवाडी येथील श्री गणेश मंदिर रस्ता प्रतीक्षेच्या छायेत
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गणेश मंदिर ला जाणारा रस्ता (road) अतिशय निकृष्ट आहे. तसेच गटारी नसल्याकारणाने सांडपाणी पूर्णपणे रस्त्यावरून वाहत असते.
श्री गणेश मंदिर ला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला व नागरिकांची संख्या अधिक आहे. दर मंगळवारी व संकष्टी दिवशी येथे भावीक भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. छोटे-मोठे अपघात होत आहेत.रस्त्यावरील दगडामुळे लहान बालकांना पायाला जखमा होत आहेत.
रस्त्यावरील घाण पाण्यातूनच देवदर्शनासाठी भाविक जात आहेत. त्वरित रस्ता (road) होऊन हे थांबावे अशी मागणी आता जोरदार आहे. गणेश मंदिर रस्ता व्हावा ही सर्व ग्रामस्थांची, भाविक भक्तांची मागणी आता जोर धरत आहे.