जयसिंगपुरच्या तरुणीचा पंढरपुरात हृदयद्रावक अंत

(crime news) सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर (Pandharpur) याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीनं आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला (Woman commits suicide) आहे. संबंधित तरुणीनं पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत (Jump from building) आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना उघडताच जखमी अवस्थेतील तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

शैलजा शहापुरे असं मृत पावलेल्या 35 वर्षीय तरुणीचं नाव आहे. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. संबंधित तरुणीनं मानसिक त्रासातून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (crime news)

पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, मृत शैलजा ह्या गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. यामुळे सांगलीतील मानसोपचार तज्ज्ञांकडून तिच्यावर उपचार देखील करण्यात येत होते. दरम्यान, रविवारी शैलजा या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील एका सोनाराच्या दुकानात सोनं मोडायचं असल्याबाबत केवळ चौकशी केली.

दरम्यान, पालिकेच्या इमारतीचं शटर उघडं असल्याने त्यांनी तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला आणि कोणाला काही कळायच्या आत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी आसपासच्या लोकांनी शैलजा यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत शैलजा यांच्या वडिलांची चौकशी केली असता, त्यांना कोणावरही संशय नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *