3 वर्षीय चिमुरडीवर धक्कादायक भयंकर प्रसंग

(crime news) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ होताना दिसत आहे. उरण परिसरात एका 3 वर्षीय चिमुकलीवर नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतक्या लहान वयाच्या चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहते आहे. तर आरोपी हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करुन आपल्या बहिणींसह राहत आहे.

आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन आली होती. त्याचवेळी या संधीचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी आली. घडलेल्या घटनेचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला होता. तसंच, तिला गंभीर इजादेखील झाली होती.

लैंगिक अत्याचारानंतर पीडित तरुणी आपल्या घरी परतली. त्यानंतर ती एका कोपऱ्यात गुपचूप बसून होती. तसंच, तिला सतत रक्तस्त्राव होत होता. चिमुरडीच्या आईचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर तिला एकच धक्का बसला. लेकीला काय झालं हे तिला कळेनासे झाल्याने तिच्या आईने तिला तातडीने नेरुळ मधील मनपा रुग्णालयात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. (crime news)

लेकीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येताच आईने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेची तातडीने चौकशी करताच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हा गुन्हा केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *