जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 21 मुला- मुलींचे इयत्ता पहिली मध्ये नाव नोंदणी

पत्रकार नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळा (school) कुमार विद्या मंदिर येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ११ मुली व ९ मुले यांचे इयत्ता पहिली मध्ये नाव नोंदणी झाली.

आमची शाळा जिल्हा परिषद शाळा या अनुषंगाने जून पर्यंत एकूण 45 मुले -मुली यांची इयत्ता पहिली मध्ये नाव नोंदणी होईल अशी आशा आहे. उत्कृष्ट शाळा, शाळा व्यवस्थापन, चांगले शिक्षण, यामुळे नेहमी शाळा नावलौकिक मध्ये राहिली आहे.

सांस्कृतीक स्पर्धा असो किंवा खेळामध्ये नेहमी या शाळेने जिल्हास्तरीय तालुकास्तरीय नंबर पटकावलेले आहेत. जिल्हा परिषद शाळा कुठे कमी नाहीत. हे या या शाळेतील मुला-मुलींनी शिक्षकांनी दाखवून दिले आहेत.

पालकांचा सुद्धा उत्साह या शाळेकडे दिसू येतआहे.शाळेमध्ये (school) नाव दाखल करण्यासाठी पालकांनी पेढे ,नारळ , परंपरा पद्धतीने देऊन नाव नोंदणी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षिका ,पालक ,महिला, शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य , पत्रकार नामदेव निर्मळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *