माजी आमदार स्व. आप्पासाहेब वर्ग सा. रे. पाटील साहेब यांच्या विचारांचा वास व वारसा घेऊन वाटचाल करणारे गणपतराव दादा यांचे कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व हे प्रेरणादायी

(local news) शिरोळ दत्तनगर प्रतिनिधी: हजारो एकर नापीक, क्षारपड जमीन पिकाऊ करुन जमिनीचे आरोग्य सुधारणारे, श्री दत्त आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लाखो नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आणि कारखान्यातील मशिनरी अद्ययावत करून यंत्रांची योग्य काळजी घेणारे म्हणजेच माती, माणुस आणि मशीन यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणारे एक आदर्श व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री दत्त उद्योग समुहाचे सर्वेसर्वा श्री गणपतराव पाटील दादा होय. शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व आप्पासाहेब वर्ग सा. रे. पाटील साहेब यांच्या विचारांचा वास व वारसा घेऊन वाटचाल करणारे गणपतराव दादा यांचे कर्तृत्व,नेतृत्व व दातृत्व हे प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य व शिक्षण संचालक श्री अंबाप्रसाद नानिवडेकर यांनी काढले.

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील साहेब यांच्या 8 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशन, नॅब नेत्र रुग्णालय, श्री दत्त आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. श्री दत्त उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उदघाटन कार्यक्रमात व्यासपीठावर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील, माजी जि प सदस्य श्री राजवर्धन नाईक निंबाळकर, जेष्ठ संचालक श्री महेंद्र बागे, श्री दरगु गावडे, आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा शेरबेट, स्व सा रे पाटील सोशल फाउंडेशन चे श्री नितिन बागे, श्री जयदीप थोरात, अमोल माने, संदीप माने, नॅबच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अदिती भोसले, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन चौगुले, डॉ प्रिया खाडे इ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व स्व. सा. रे. पाटील साहेबांच्या प्रतिमा पुजनाने झाली.

स्वागत व प्रास्ताविक श्री दत्त आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी केले. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा शेरबेट यांनी आपल्या मनोगतात स्व. सा. रे. पाटील साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला व अंध लोकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या नॅब या संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा गौरव केला. अध्यक्षस्थानावरुन बोलताना श्री गणपतराव पाटील यांनी मोफत नेत्र तपासणी व माफक दरात मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे प्रयोजन सांगुन जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व स्व. सा. रे. पाटील साहेबांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री डॉ कुमार पाटील यांनी केले. (local news)

शिबिरात 90 हुन अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन 30 रुग्णांना तात्काळ मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मिरज येथील नॅब नेत्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नॅब चे श्री विजय यादव, श्री मयुरेश आंबी, श्री विश्वास बेंद्रेकर, श्री मंदारप्रभु देसाई, स्व. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनचे श्री नितिन बागे व त्यांचे सर्व सहकारी यांच्यासह श्री दत्त आरोग्य केंद्राचे नेत्र तंत्रज्ञ श्री श्रीकृष्ण खोंद्रे व आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *