शिरोळात स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौडेंशनच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ

(local news) शिरोळ प्रतिनिधी शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व डॉ अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिरोळ येथे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौडेंशनच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील शासकीय कार्यालयात कामानिमित्त तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे सध्या उन्हांच्या झळा तीव्र झाल्या आहेत त्यामुळे आलेल्या नागरिकांना उन्हांत शुद्ध आणि थंड पाणी मिळावे यासाठी येथील पोलीस ठाणे समोर स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचा शुभारंभ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईसचेअरमन अरुणकुमार देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील महेंद्र बागे शेखर पाटील दरगू गावडे बाळासाहेब पाटील( हलसवडे) नगरसेवक योगेश पुजारी उद्योगपती प्रकाश कुंभार शक्तीजीत उर्फ चिकू गुरव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौडेंशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *