श्री दत्त भांडार मेडिकल स्टोअर आणि आंबा विक्रीचा शुभारंभ
शिरोळ /प्रतिनिधी:
श्री दत्त उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्री दत्त भांडार येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच श्री दत्त भांडार मेडिकल स्टोअर जेनेरिक मेडिकलचे उद्घाटन (Opening) माजी पोलीस महासंचालक श्रीमती डॉ. मीरा चढ्ढा बोरवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे कोकणातील नैसर्गिकरित्या पिकवलेल्या शेतकरी ते ग्राहक अशा संकल्पनेतून भव्य आंबा विक्रीचा शुभारंभही मीरा चढ्ढा बोरवणकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
(Opening) मीरा बोरवणकर यांचा सत्कार दत्त भांडारच्या वतीने करण्यात आला. त्यांनी भांडारच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, लाईफ स्टार्टचे डायरेक्टर रवींद्र बिडकर, लाइफ स्टार्ट जेनेरिक फार्मसीचे राज्य प्रमुख अरुण बालटे कोल्हापूरचे माजी उपमहापौर सत्यजित कदम यांच्यासह चेअरमन दामोदर सुतार, व्हाईस चेअरमन अनिता कोळेकर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक रघुनाथ पाटील, प्रमोद पाटील, दरगू गावडे, श्रीमती विनया घोरपडे, संगीता पाटील कोथळीकर, यशोदा कोळी यांच्यासह सर्व संचालक तसेच मेडिकल स्टोर इन्चार्ज आयेशासिद्धीका बाणदार, जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे, सुहास मडिवाळ, दीपक ढोणे, अभिजीत पाटील, रतन धुरी, महेंद्र ठाकूर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, सभासद, ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते.