टाकळीवाडी चे सुपुत्र मा. श्री.सुदर्शन शिरगुप्पे भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त गावामध्ये जंगी मिरवणूक
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सुदर्शन शिरगुप्पे हे भारतीय सेनेमध्ये २००६ या वर्षी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये भरती झाले. भारतीय सेनेमध्ये देशसेवा यांनी जम्मू-काश्मीर राजुरी, रामबन, श्रीनगर ,कुपवाडा ,बरमुला ,पुणे, बेळगाव , या ठिकाणी केली. लहानपणापासून त्यांना भारतीय सेनेबद्दल आदर व प्रेम होते. फार जिद्दीने त्यांनी भारतीय सेना मध्ये दाखल झाले.
सन २००६ वर्षी ते पुणे येथे भरती झाले. त्यांचे ट्रेनिंग बेळगाव येथे पूर्ण झाले. सेवानिवृत्त बेळगाव येथे झाले. १ एप्रिल 2023 रोजी ते भारतीय सेना म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावांमध्ये जंगी मिरवणूक करण्यात आली. बोलताना म्हणाले आता इथून पुढे मला देशसेवे बरोबर समाजसेवा ही मला करायचे आहे. व तेही निस्वार्थपणे काम करण्याचे त्यांनी इच्छा व्यक्त केली.
विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आपण जग पाहिले व भारतीय सेना मध्ये नोकरी लागली. असे आदरणीय आई-वडिलांना रथ मध्ये बसून आई-वडिलांनाची मिरवणूक काढण्यात आली. यांचा सत्कार टाकळीवाडी सैनिक असोसिएशन व नामदेव निर्मळे पत्रकार आदींनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (local news)
मिरवणुकीला गावातील सर्व नागरिक ,महिला, पै पाहुणे, समस्त जैन परिवार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.