स्व. माजी आमदार दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक माजी आमदार, माजी जि.प. अध्यक्ष, दलितमित्र आदरणीय स्व. दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही संचालक रणजीत कदम यांनी, स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक अरूणकुमार देसाई यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक विजय सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले. तसेच या प्रसंगी कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, इंद्रजीत पाटील, रघुनाथ पाटील, अॅड.
प्रमोद पाटील, बाबासो पाटील,विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, अमर यादव, शेखर पाटील, शरदचंद्र फाटक, निजामसो गौस पाटील, संचालिका विनया घोरपडे,
यशोदा कोळी, संगिता पाटील-कोथळीकर, महेंद्र बागे, दरगु गावडे, प्रदिप बनगे, मलकारी
तेरदाळे, बाळासाहेब पाटील हलसवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील
यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तसेच धनाजी पाटील नरदेकर, बापु गंगधर,
शिरोळचे नगर सेवक तातोबा पाटील या सोबतच महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद कार्यकर्ते
तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटी, पॉलिटेकनिक कॉलेज, आयटीआय व दत्त भांडारचे सर्व संचालक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.