टाकळीवाडी येथील भाग्योदय महिला विकास सेवा संस्था येथे आनंदाचा शिधा वाटप
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील भाग्योदय महिला विकास सेवा संस्था येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. गुढीपाडवा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिधा (ration) वाटप रेशन दुकानात करण्यात आला.
माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गोरे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, जुबेर जमादार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता. फक्त शंभर रुपयांत शिधा (ration) उपलब्ध झाला. एकूण ३२७ रेशन कार्ड धारक असून 324 लाभार्थीना शिधा चा लाभ मिळेल.