सैनिक टाकळीतील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव भीमराव पाटील यांच्या दखलीमुळे रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण
पत्रकार नामदेव निर्मळे
_________
(local news) सैनिक टाकळी .तालुका:- शिरोळ जिल्हा :-कोल्हापूर येथील टाकळी, दानवाड, व टाकळी, दत्तवाड येथील रोडवरील स्पीड बेकर तसेच खंडे पडलेले होते .त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते . फोर व्हीलर गाडी, दुचाकी, स्वार यांचे अपघात होण्याचा संभव होता .रात्री हे खड्डे दिसत नव्हते .
ही बाब माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव भीमराव पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जी.सी .बागवान उप अभियंता पीडब्ल्यूडी जयसिंगपूर यांच्याकडे रस्ता दुरुस्तीच्या कामाची शिफारस करून बागवान साहेब यांना विनंती करून रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ व्हावे ही विनंती केली .
जी.सी .बागवान साहेब यांनी त्यांच्या प्रयत्नातून तात्काळ कामाची पूर्तता केली. व टाकळी दत्तवाड चौकातील चार रस्ते एकत्र होते. त्या ठिकाणी स्पीड बेकर चे काम करून घेतले. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच टाकळी, दानवाड, लक्ष्मी मंदिराच्या पुढील रस्त्याचे अधुरीत काम बागवान साहेबांनी प्रयत्न करून लवकर पूर्ण करून द्यावे ही विनंती केली.
सामाजिक कार्यकर्ते महादेव भीमराव पाटील हे सैनिक टाकळीतील गाव विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. महादेव पाटील बोलताना म्हणाले की माझी एकच इच्छा आहे की रस्ते खड्ड्यामुळे रस्त्यावरील अपघात टाळावे. महादेव पाटील यांनी जी. सी. बागवान साहेब उप अभियंता पी. डब्लू .डी. जयसिंगपूर यांचे मनःपूर्वक आभार मानले. व रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. (local news)
यापुढे बागवान साहेबांनी असे सहकार्य करावे ही सैनिक टाकळीकर यांची इच्छा आहे .व गाव विकासासाठी महादेव पाटील यांच्यासारखे गावातील सर्वांनी पुढे यावे व गावाचा विकास करावा.