गणेशवाडी येथे विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकर जयंती साजरी
गणेशवाडी/ प्रतिनिधी:
(local news) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती महोत्सवाचे निमित्त साधून गणेशवाडी (तालुका शिरोळ) येथे वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्याच्या वतीने गणेशवाडी येथे दोन शाखांचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा पक्ष निरीक्षक अतुल बहुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप प्रल्हाद कांबळे तसेच तालुका सचिव संदीप मधुकर कांबळे उपस्थित होते.
दर्गा चौक गणेशवाडी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर, चित्रकला, रांगोळी, बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धा, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. गणेशवाडीचे सुपुत्र रसूल कोरबू यांचा शिवाजी युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वंचितच्या वतीने त्यांचा सत्कार अतुल बहुले यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी यांचा गुलाब पुष्प व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकाची प्रत देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. पक्ष निरीक्षक अतुल बहुले यांनी आपले मनोगत व्यक्त करून वंचितच्या कार्याचा आढावा घेतला. प्राध्यापक रसूल कोरबु यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर नटराज कलामंच मुंबई यांचा प्रबोधनात्मक व भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. (local news)
यावेळी सरपंच प्रशांत अभिनय, उपसरपंच जयपाल खोत, ग्रामपंचायत सदस्य पोपट लोंढे, माजी सरपंच, विद्यमान सदस्य शरद कांबळे, रफिक जमादार, प्रभाकर भोसले, राहुल कोळेकर, अनिल लोंढे, सलीम कोरबू, सुधीर गाताडे, वंचित बहुजन आघाडी गणेशवाडी शाखेचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, शाखा दोनचे अध्यक्ष अशोक शिवाजी कांबळे यासह गावातील मान्यवर उपस्थित होते
संजय सुतार
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
वंचित बहुजन आघाडी