नृसिंहवाडी येथील गुरुपीठात” श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी “भक्तिमय वातावरणात साजरी
पत्रकार नामदेव निर्मळे
श्री क्षेत्र नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये “श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी” विविध धार्मिक कार्यक्रमासह हजारो (devotee) भाविक, सेवेकर्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी झाली .
पुण्यतिथी निमित्त गेले सात दिवस सुरू असलेले सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण, व अखंड नाम, जप ,यज्ञ सप्ताहाची सांगता बलिपूर्णाहुती देऊन व सत्यदत्त पूजन करून साडेदहा वाजता महाआरतीने करण्यात आली. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम व तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
यामध्ये नित्यस्वाहाकार ,गणेश याग ,मनोबोध याग, चंडीयाग ,स्वामी याग, गीताई याग, मल्हारी याग, रुद्र याग तसेच श्री दुर्गा सप्तशती, श्री मल्हारी सप्तशती ,श्री स्वामी चरित्र सारामृत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, नवनाथ भक्तिसार, सुलभ भागवत, हवनयुक्त श्री गुरुचरित्र पारायण वाचन करून श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र ,नवार्णव मंत्र ,महामृत्युंजय मंत्र ,24 तास प्रहरी ,शांतीपाठ, करुणाष्टक ,चरण सेवा आदी सेवा श्री स्वामी चरणी रुजू करण्यात आल्या .
सप्ताह काळात तज्ञ मान्यवरांनी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ गुरुपीठाद्वारे 18 विभागातून चालणाऱ्या विविध सेवांची सहज सोप्या भाषेत माहिती देऊन प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन केले.
सप्ताह काळात सेवेकर्यांनी दत्तधाम समोरील औरवाड जुना पूल जवळील घाटाची व संगम घाटाची स्वच्छता केली. पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्रसह कर्नाटकातील हजारो (devotee) भाविक ,सेवेकर्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन “श्री स्वामी समर्थ महाराज की जय “चा नाम घोष करीत महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शन घेण्यासाठी भाविक, सेवेकर्यांच्या रांगा लागल्या होत्या.