सांगली येथील कर्नाळ रस्त्यावर गांजा जप्त; एकास अटक

(crime news) येथील कर्नाळ रस्त्यावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील संजय सदामते (वय 28) याला शहर पोलिसांनी अटक केली. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. सदामते याच्याकडून सव्वाकिलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

जत तालुक्यातून गांजा घेऊन सांगलीत विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली. कर्नाळ रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. सदामते याला पकडले. त्याची अंगझडती घेण्यात आली. हातात पिशवी सापडली. त्यामध्ये सव्वाकिलो गांजा सापडला. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *