चिंचवाड सुपुत्रांचा श्री गुरुदत्त शुगर्स चेअरमन मा. माधवराव घाटगे साहेब यांच्या हस्ते श्री गुरुदत्त कारखान्यावर सत्कार
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) चिंचवाड तालुका शिरोळ येथील सुयोग चौगुले भूमी अभिलेख म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल तसेच राहुल घाटगे यांची मुंबई हाय कोर्ट मध्ये क्लार्क म्हणून नेमणूक तसेच ऋतुजा कदम MHT -CET परीक्षेमध्ये 99.89 गुणाने उत्तीर्ण झाल्याबद्दल या तिघांचा सत्कार करण्यात आला.
एकाच गावातील तिघानी गावचे नाव रोशन केले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे बोलताना श्री गुरुदत्त शुगर्स चेअरमन मा.माधवराव घाटगे साहेब म्हणाले व यांच्या हातून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल घाटगे माजी सरपंच, बबन चव्हाण, विजय कदम, सुनील चौगुले, गीता घाटगे उपस्थित होते. सर्वत्र यांचे कौतुक होत आहे. (local news)