शिरोळ: दलित संघटना बदनाम करण्याचे षड्यंत्र
प्रतिनिधी:-विजय पाटील -शिरोळ तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी काल दिनांक 8/02/2022 रोजी मोर्चा काढून मा. तहसीलदार यांना आमचे विरुद्ध खंडणी मागत असल्याचा आरोप करून आम्ही त्यांना नाहक त्रास देत आहोत अशा प्रकारचे निवेदन दिले आहे त्या संदर्भात आम्ही खुलासा देत आहोत.
जानेवारी महिन्यामध्ये आम्ही जयसिंगपूर येथील रास्तभाव दुकान नंबर 2.3.5 च्या काळाबाजाराचे चित्रीकरण करून जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके साहेब यांच्याकडे सदर पुरावे सादर करून त्याचा पाठपुरावा करून मा.तहसीलदार अपर्णा मोरे, शिरोळ यांच्या जागृत भूमिकेमुळ तिन्ही दुकानांचे परवाने रद्द करण्यास भाग पाडले. हा राग मनात धरून गोरगरिबांच्या पोटावर दरोडा टाकून मिळवलेल्या पैशाच्या जोरावर व संघटनेच्या ताकदीच्या जोरावर आम्हाला नाहक बदनाम करण्याचा यांचा प्रयत्न आहे. तसेच जानेवारी महिन्यातील जयसिंगपुरातील तीन दुकाने रद्द या ठिकाणच्या कामातही प्रशासनाकडून अनेक गोष्टी दडपण्याचा प्रयत्न झाला आहे.
चौकशीमध्ये याचे पुरावेदेखील आम्ही सादर करू याचप्रमाणे शिरोळ तालुक्यातील व हातकणंगले तालुक्यातील अनेक रास्तभाव रेशन दुकानदारांचा काळाबाजार उघडकीस येईल या भीतीने सर्व दुकानदार एकत्रित येऊन आमच्यावर बिन बुडाचे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला बदनाम करून त्यांचा काळाबाजार कशा पध्दतीने सुरू ठेवता येईल याचा एक फंडा म्हणून त्यांनी खंडणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
शासनाकडून राबविण्यात येणारी पिडीएफ प्रणालीचा हे दुकानदार कसा गैरफायदा उचलून गोरगरिबांच्या पोटावर दरोडा टाकतात याचे पुरावे चौकशीत सादर करू शिरोळ व हातकणंगले तालुक्यात शिधापत्रिका धारकाना अपुरे मिळणारे धान्य याबाबत लोक जागृती केली जात आहे शिवाय सामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारकांचे हक्क व अधिकार शाबूत ठेवून भ्रष्टाचाराचा पोल-खोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. पण हा राग मनात धरून संघटनेच्या बळावर धान्य दुकानदार प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत.
मात्र सत्य व न्यायासाठी श्वासात श्वास असेपर्यंत प्रसंगी कायदेशीर लढाई करून सामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ. खंडणी मागत असल्याचा बोभाटा करून दलित सेनेचे नाव बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
माहिती अधिकार हा संविधानिक अधिकार असून याच्या माध्यमातून व दलित सेना, सामाजिक संघटनेच्या सहकार्याने लाभार्थ्यास ऑनलाईन मिळणारे धान्य व प्रत्यक्षात दिले जाणारे धान्य यामध्ये दिसणारी कमालीची तफावत, लाभाथ्यांचे दुकानदारा बददलच्या प्रतिक्रियांची चित्रीकरण असे पुरावे आम्ही गोळा केले आहेत.
रास्तभाव दुकानदार संघटनेच्या पदाधिकारि यानी केलेले बिनबुडाचे आरोप है चौकशी अती सिद्ध न झाल्यानंतर मानहानीच्या दाव्यास सामोरे जावे.
आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार.
असे आश्वासन दलित संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू बनपट्टी, दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई, चांगभलं न्युज चे संपादक सतीश मोठे यांनी केले आहे.