सीपीआरमध्ये रुग्णांचे टेन्शन वाढले
हिमोफेलिया आजाराने (illness) ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारे फॅक्टर आठ व नऊ इंजेक्शनचा सीपीआरमध्ये तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे टेन्शन वाढले आहे. सीपीआरमध्ये हे इंजेक्शन मोफत मिळते, तर खासगीत त्यांची किंमत 20 हजार आहे. सर्वसामान्यांना शासकीय रुग्णालये आधारवड आहेत. हिमोफेलियावरील इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्ण भयभीत झाले आहेत. सीपीआरमध्ये सुमारे 490 हिमोफिलियाचे रुग्ण असून 8 फॅक्टरचे 350, तर 9 फॅक्टर इंजेक्शनचा उपचार घेणारे 125 रुग्ण आहेत.
आनुवंशिकतेशी संबंध काय ?
कुटुंबातील 33 टक्के सदस्यांना हा आजार नसला, तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्यता नाही. मात्र, अनेकदा म्युटेशनमुळे तसेच प्रोटिन्सची कमतरतेने हा आजार होतो.
हिमोफिलियाची लक्षणे कोणती?
गुडघे, कोपर अथवा इतर स्नायूंमध्ये सूज येणे, त्यामध्ये सतत कळ असणे ही लक्षणे आहेत. जखम झाली तर रक्त थांबत नाही.
जेनेटिक ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणजे काय ?
हा आजार (illness) प्रामुख्याने आनुवंशिक असल्याने काळजी घ्यावी लागते. यात नाकातून रक्त येणे, जखमेचे रक्त न थांबणे ही लक्षणे आढळतात. यात कुटुंबातील कुणाला हा त्रास असेल तर तो होत असतो.
कशामुळे होतो हा आजार ?
आनुवंशिक परिवर्तनामुळे हा आजार होऊ शकतो. ही प्रक्रिया रक्त गोठवण्यार्या प्रोटिन्सला निर्देशक ठरत असल्याने आजार बळावत जातो. हिमोफिलिया मूलतः पुरुषांचा आनुवंशिक आजार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काळजी काय घ्यावी ?
गंभीर आजारावेळी शिरांच्या माध्यमातून रक्त देऊन या आजारावर उपचार केले जातात. रक्तदान ही प्रक्रिया होते. नियमित व्यायाम आणि गोळ्या न खाताही उपचार होतात.