…आणि काळजाचा ठोका चुकला! रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्याचा असा वाचला जीव

शिवडी रेल्वे स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील रेल्वे रुळावर लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी वाचवले. शिवडीतील रामगड झोपडपट्टी (शिवडी कोर्ट रोड, टिंबर पॉईंट, हाजी बंदर) येथे राहणारे मधुकर साबळे (वय ५९) सोमवार, (ता. २७) डिसेंबर रोजी रेल्वे रुळावर झोपले. हे घरगुती अडचणी व वैयक्तिक कारणामुळे कंटाळून ते आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते.
लोकलच्या मोटरमनने लांबूनच रुळावर पाहिले. लोकलचा वेग कमी करून लोकल थांबवली. त्याच दरम्यान शिवडी स्थानकात कार्यरत असणाऱ्या वडाळा लोहमार्ग महिला पोलिस अंमलदार धनश्री पंडित शेलार व महिला होमगार्ड ऋतुजा राहुल मांडये यांनी त्याचवेळी रेल्वे येत असल्याचे पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ रेल्वे रुळाच्या दिशेने ते धावले. त्यांनी मधुकर साबळे यांचा जीव वाचवला. या घटनेकडे काळजाचा ठोका चुकवून पाहणाऱ्या प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले.आत्महत्या करणाऱ्या साबळे यांना वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. त्यांना त्यांची सून अनिता साबळे (वय ३०) यांच्या ताब्यात देण्यात आले. अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी डी.एम खुपेरकर यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *