कोल्हापूर : पुढील महिन्यात कामाला प्रारंभ; जिल्ह्यातील उत्पन्नवाढीला मिळणार चालना
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या (highway) मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ भूसंपादनाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारीपर्यंत निविदा येणार असून, त्यानंतर ठेकेदारावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर तातडीने कामाचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची अट असल्यामुळे साधारण २०२४-२५ मध्ये हे काम पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.
किरकोळ विरोध वगळता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन (Land acquisition)पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७० किलोमीटरचे काम सुरू होण्यास हरकत नसल्याने महार्मागाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शिये, भुये परिसरातील काही नागरिकांनी महामार्गाला विरोध केला होता. मात्र, आता बहुतांश जमीनदारांचा विरोध मावळला असून, त्यांनी भूसंपादनाला परवानगी दिली आहे. त्यांचा सविस्तर तपशील आज सरकारने प्रसिद्ध करून गॅझेट केला आहे. साधारण २५ एकराचे भूसंपादन शिल्लक असून, त्याचीही प्रक्रिया लवकरच पूर्ण हेईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पीआययू कोल्हापूरचे प्रकल्प संचालक अभियंता वसंत पंदारकर यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या विकास किसन गवळी याच्या याचिकेवरील निकालाने रद्द केलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ओबीसींचे २७ टक्के आरक्षण राज्य सरकारनं अध्यादेशानं कायम केलं होतं.
रत्नागिरी-नागपूर महामार्ग (highway) जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर आणि हातकणंगले अशा तालुक्यातून जातो. त्याच्या मोजणीसह भूसंपादनाला काही ठिकाणी विरोध होता. मात्र, आता तो मावळल्यामुळे कोकणाला जोडणारा राष्ट्रीय महामार्गाचे काम पुढील वर्षात सुरू होण्यावर शिक्कमोर्तब झाले आहे.
उत्पन्नवाढीला चालना
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील पर्यटक कोकणात कमी वेळेत जातील. तसेच व्यावसायिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यातून उत्पन्न वाढीलाही चालना मिळणार आहे.