‘या’ लग्नात सहभागी होताच सलमान खान झाला Troll
(entertenment news) कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बारवाडा या आलिशान हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचं शाही लग्न झालं होतं. लग्नापूर्वी दोघंही जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्याचवेळी या शाही लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. परंतु सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कतरिनाचा खास मित्र आणि एक्स बॉयफ्रेंड बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) तिच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही.
त्यावेळी सलमान खान त्याच्या द-बंग टूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी रियादला रवाना झाला होता.आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त सलमान खानच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कतरिना कैफच्या लग्नात सहभागी झाला नव्हता. त्याचवेळी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी गुरुवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सलमानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खान मुंबईत एका लग्नसोहळ्यात सहभागी होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सलमान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (entertenment news)
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर कमेंट बॉक्समध्ये लिहित आहेत, ‘भाईला कतरिनाने लग्नासाठी आमंत्रित केलं नव्हतं का?.’ त्याचवेळी आणखी एका युजरनं लिहिलं की, ‘सलमानपेक्षा शेरू स्टार वाटतो.’ तर, विकी-कतरिनाच्या लग्नापूर्वी सलमानची बहीण अर्पिता खाननं ETimes ला सांगितलं होतं की, “आम्हाला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. तर, आम्ही कसं जाणार?” अर्पितानं यापूर्वी असंही सांगितलं होतं की, तिच्या कुटुंबाला लग्नाचं निमंत्रण दिलं गेलं नाही. कतरिना कैफचं सलमानच्या दोन बहिणी अर्पिता आणि अलविरासोबतही खूप चांगलं बाँडिंग आहे.
वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सलमान खान नुकताचआपला मेहुणा आयुष शर्मासोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसला होता. हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट होता.परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होत असल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट या महिन्यात म्हणजेच 24 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म ‘Zee5’ (Antim: The Final Truth zee5) वर प्रदर्शित होत आहे