पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही – पाटील
पंकजा या भारतीय जनता पक्षाला संघर्ष करायला शिकवणाऱ्या गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे समजूतदारपणा आहे. म्हणूनच त्यांनी नाराज कार्यकर्यांना राजिनामा देण्यापासून परावृत्त केले. पार्टी हे आपले घर आहे. आपण आपल्या घरातून का बाहेर पडायचे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पंकडा मुंढे अतीशय समजुतदार नेत्या आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यशक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. कोरोनाकाळात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पंकजा मुंडे यांच्या नाराजगी बाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले,‘केंद्रीय मंत्रीमंडळात ४० नवीन मंत्री झाले. देशातील लोकप्रतिनिधींची संख्या, प्रादेशिक आणि जातीय प्रतिनिधित्व या सर्वाचा विचार करता प्रत्येक कर्तुत्ववान व्यक्तीला मंत्री पद मिळतेच असे नाही. त्यामुळे यामध्ये कोणावर तरी अन्याय होणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होणे सहाजिक आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजगी व्यक्तही केली पाहीजे. पंकजा मुंडे यांना गोपिनाथ मुंडे यांचा वारसा लाभला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी कार्यालयातील भाजप संघर्षासाठी रस्त्यावर आणला. त्यामुळे पंकजा मुंडे आपली नाराजगी व्यक्त करतील पण कधीही बंड करणार नाहीत. राजिनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजावून सांगितले. यातून पंकजा मुंडे यांचा समजूतदारपणा दिसतो.‘
देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ देवस्थान समितीच्या जमिनीचे रजिस्टर १८८५ साली ब्रिटीशांनी केले. त्यामध्ये देवस्थान जमिनीच्या नोंदी आहेत. त्यानंतर असा नियम करण्यात आला. की या जमिनी या रजिस्टरमधून बाहेर काढाव्यात. मुळात ज्या देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर होतो. त्याची या रजिस्टरमध्ये नोंदच नाही. १९५५ सालापासून ही जमीन एका व्यक्तीच्या नावावर आहे. नंतर त्या व्यक्तीने या जमिनीचा ट्रस्ट केला असेल. १९९७ साली ही जागा विकण्याची परवानगी धर्मादाय आयुक्तांनी दिली. २००८ साली देवस्थान काढून क्लास वन करायला परवानगी दिली. दोन्ही वेळा मी सरकारमध्ये नव्हतो. त्यानंतर या जमिनीचा नजराणा किती घ्यायचा याचा वाद सुरू झाला. त्यामुळे ही फाईल मी पुर्नविचारासाठी पाठवली. त्यामुळे यात भ्रष्टाचार करण्याचा प्रश्नच कुठे आला? हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे‘