सांगलीत महिलेसोबत भयंकर प्रकार

(crime news) येथील काळ्या खणीनजिकच्या सुंदरनगर वसाहतीमध्ये संगीता उर्फ सुनीता निखिल मलिक (वय २८) महिलेवर रविवारी रात्री उशिरा चाकूने हल्ला झाला. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, सुंदरनगर परिसरात राहणाऱ्या मलिक यांच्याकडे रात्री उशिरा एकजण आला. त्यांच्यात वाद झाला. हल्लेखोराने चाकूने संगीत यांच्या पोटावर, मानेवर वार केल्याने त्या जखमी झाल्या. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संगीत यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी दिली. (crime news)

काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक महिलेचा संपत्तीच्या कारणातून खून करण्यात आला होता. त्यानंतर आत खुनी हल्ल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *